Monday, June 27, 2022
Homeचंद्रपुरकेंद्र सरकारने इंधन दरवाढ कमी करुन सामान्य माणसाला दिलासा द्यावा.

केंद्र सरकारने इंधन दरवाढ कमी करुन सामान्य माणसाला दिलासा द्यावा.

पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढ कमी करावी यासाठी युवक काँग्रेसचे धरणे आंदोलन.

राजुरा (ता.प्रा.) :- तहसील कार्यालय राजुरा येथे युवक काँग्रेस राजुरा च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. महामहीम राष्ट्रपती यांना मा. तहसीलदार, राजुरा यांचा मार्फत पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ कमी करुन जनतेला दिलासा देण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकारकडून दररोज होत असलेली डिझेल, पेट्रोल, गॅसची इंधन दरवाढ थांबविण्यात केंद्र शासन सपशेल अपयशी ठरले आहे. गेल्या सहा वर्षात एकूणच अनेक वस्तूंची दुपटीने झालेली भाववाढ बघुन सर्वसामान्य जनता मात्र त्रस्त झालेली आहे. त्यामुळे सरकारच्या या जनविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आज दिनांक १७ फेब्रुवारी २०२१ ला महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस कमेटीच्या सुचनेनुसार राजुरा विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होते.
जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनात पेट्रोल, डिझेल व गॅस इंधन आवश्यक बाब आहे. त्यामुळे यांच्या गगनाला भिडणाऱ्या किमती सर्व सामान्यांचे कंबरडे मोडत आहे. या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन दरवाढ कमी करावी व सामान्य माणसाला न्याय मिळवून द्यावा असे प्रतपादन नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी धरणे आंदोलनात उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.
या प्रसंगी सुनील देशपांडे उपनगराध्यक्ष, रंजन लांडे, अध्यक्ष राजुरा तालुका काँग्रेस कमटी, एजाज अहमद अध्यक्ष विधानसभा युवक काँग्रेस कमिटी, साईनाथ बतकमवार अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना राजुरा, मंगेश गुरणुले उपसभापती प.स., संतोष गटलेवार अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, संतोष शेंडे अध्यक्ष तालुका युवक कॉंग्रेस, अशोक राव अध्यक्ष शहर युवक काँग्रेस कमिटी, राजुरा नगर सेवक आनंद दासरी, गजानन भटारकर, गीता रोहणे, साधना भाके, संतोष इंदुरवर, इरशाद शेख, आकाश मावलीकर, प्रणय लांडे, नीरज मंडळ, रामभाऊ डूमणे, विनोद दरेकार, हेमंत दाते,उमेश गोरे, आकाश चोथले, युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular