Saturday, June 25, 2022
Homeचंद्रपुरकॅन्सरग्रस्त रूग्णाला आमदार सुभाष धोटे यांच्याकडून एक मदतीचा हात.

कॅन्सरग्रस्त रूग्णाला आमदार सुभाष धोटे यांच्याकडून एक मदतीचा हात.

उपचारासाठी ४० हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण.

राजुरा (ता.प्र) :–

शेतकरी सन्मान कल्याण निधी अंतर्गत कॅन्सरग्रस्त लाभार्थी रूग्ण श्रीमंती पार्वताबाई विठू रागीट राहणार विहीरगाव येथील रहिवाशी यांना विहीरगाव येथिल सरपंच अॅड. रामभाऊ देवईकर यांच्या पुढाकाराने आमदार सुभाष धोटे यांच्याकडून कॅन्सरग्रस्त रुग्णाला जिल्हा मध्यवर्ती बँके अंतर्गत ४००००/-(चाळीस हजार रुपयाचा) धनादेशाचे वितरण करण्यात आले. संकटात सापडलेल्या गरीब रुग्णांला आमदारांनी एक हात मदतीचा देऊन आर्थिक पाठबळ दिले.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, सरपंच रामभाऊ देवईकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यव्थापक सय्यद, भोयर उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular