Monday, June 27, 2022
Homeचंद्रपुरकुशल कामाच्या पुरवठा करण्यात आलेल्या साहित्याची निधी गायब

कुशल कामाच्या पुरवठा करण्यात आलेल्या साहित्याची निधी गायब

:- ब्रम्हपूरी तालुक्यातील चार ते पाच कोटी रुपयांची देयके….
:- ब्रम्हपूरी तालुक्यातील एकोणचाळीस ग्रामपंचायती चा समावेश…..
:- चार वर्षांपासून देयकांसाठी पुरवठा धारक प्रतिक्षेत….
:- ब्रम्हपूरी तालुक्यात पंचायत राज समिती सदस्य दाखल….
:-साहित्य पुरवठा धारक यांनी पंचायत राज समिती सदस्यांना निवेदन सादर….

ब्रम्हपूरी:- ब्रह्मपुरी तालुक्यात काल पंचायत राज समितीचे सदस्य दाखल झाले. पंचायत राज समिती मागील 2007 मध्ये दौरा केला असून तब्बल 14 वर्षांनी काल तीन आमदार यांच्या समितीसह ब्रह्मपुरी तालुक्यात दाखल झाले. यामध्ये आमदार देवराव होळी, आमदार किशोर जोरगेवार, आमदार कृष्णा गजबे, व संबंधित टीम उपस्थित होती. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत ब्रह्मपुरी तालुक्यात कामे करण्यात आली आहे. मात्र या कामाची देयके मागील चार वर्षापासून थकीत ठेवले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील 39 ग्रामपंचायती देयके अजूनही देण्यात आलेली नाहीत.याची देयके ४१९६६८८४/- रुपये थकीत आहेत. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागाचा विकास व्हावा मजुरांना कामा साठी भटकावे लागू नये, यासाठी शासनाने काही वर्षांपूर्वी रोजगार हमी योजना सुरू केली गावातच रोजगार मिळू लागला होता . या योजने मार्फत त्याला रोजगार उपलब्ध करून त्याला काम नसल्यास मजुरी देण्याची तरतूद सुध्दा होती. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात अनेक अकुशल व कुशल कामाचा प्रामुख्याने समावेश आहे. अकुशल कामे माती काम संबंधित येत असतात . ब्रम्हपूरी तालुक्यातील चौगान, मेंडकी, रामपुरी चिचगाव बल्लारपूर चिचखेडा अक्सापुर ,बोडधा ,वांद्रा गांगलवाडी,वायगाव,अड्याळ जाणी,चांदगाव,रानबोथली ,भुज, चिंचोली,पांचगाव,कोसंबी,आवळगाव,तोरगाव खुर्द ,जुगनाळा,
कुडेसावली,एकारा ,कळमगाव,चोरटी,रुई,रणमोचण,कालेता,नान्होरी, खंडाळा,कहाली ,हळदा, नांदगाव,बेलगाव,खरकाडा,कन्हाळगाव,मांगली ,सांयगाव ,आवळगाव यासह अन्य गावात कुशल कामा अर्तंगत साहित्य पुरवठा करण्यात आले. व कुशल कामा अर्तंगत ग्रामिण भागातील नाली बांधकाम,रस्ते,मुरुम, सिमेंट,पांदन रस्ता, अन्य कामांचा समावेश असतो. ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये सन २०१६-१७, २०१७-१८,२०१८-१९ साहित्य पुरवठा करण्यात आले.पण अजुनही या साहित्य पुरवठा धारकांचे ६४ कामांचे देयके अदा करण्यात आले नाही.सन‌ २०१६-१७ ते २०१८-१९ महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात अकुशल खर्च शुन्य असल्याने कुशल निधी मागणी करण्यात आली नाही.याबाबत महात्मा गांधी रोजगार हमी योजना नागपूर यांना २५.११.२०१९ व ७.२.२०२० मार्गदर्शन जिल्हा परिषदेने मागविले आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना २००५ च्या कायदास्वरुपात असे नमुद असताना सुध्दा या योजने अंतर्गत जास्तीत जास्त मजुरांना अकुशल कामा अर्तंगत काम देणे गरजेचे असतात.पण पंचायत समिती ब्रम्हपूरी सन २०१६ -१७ ते २०१८-१९ या वर्षात करण्यात आलेल्या कुशल कामामध्ये मजुरांना अकुशल काम उपलब्ध करून देणे गरजेचे असताना तसे न करता कुशल कामाची निधी शुन्य असताना सुध्दा कनिष्ठ अभियंता कडुन कुशल कामाचा अंदाज प्रत्रक तयार करण्यात आले.अनेक ग्रामपंचायती ने कुशल निधी अंतर्गत गावातील विकासकामे केली.पण त्या ग्रामपंचायती ला साहित्य पुरवठा धारकांचे देयके प्रशासनाच्या घोळचुकामुळे साहित्य पुरवठा धारकांचे देयके अदा करण्यात आले नाही.सदर प्रकरणात गटविकास अधिकारी प्रदिप बिरमवार, सहायक लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता,व संबंधित १३ ग्रामसेवकांना प्रशासकीय कार्यवाही करिता प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले आहे.काही ग्रामपंचायती ने कुशल कामाचे देयके मिळण्यासाठी मा.उच्च न्यायालय नागपूर येथे दाद मागितली पण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंन्द्रपुर यांनी न्यायालया च्या प्रश्नाला दाद दिली नाही.कोटी रुपयाचे देयके अडविले असल्याने पुरवठा धारक मानसिक तणावाखाली वावरत आहेत.काल ब्रम्हपूरी तालुक्यात पीआरसी टीम दौरा असल्याने पीआरसी टीम ला साहित्य पुरवठा धारकांनी निवेदन सादर करून व्यथा मांडली. पीआरसी चे मुख्य उद्देश म्हनजे जिल्हा परिषद मध्ये असलेल्या सर्व यंत्रणा तपासणी करून त्रुटी व सुधारणा तथा भ्रष्टाचार समोर यावे यासाठी व ग्रामिण भागातील समस्या झालेल्या अनियमता तपासून काढणे व चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.हेच या समितीचे ध्येय असते.ब्रम्हपुरी तालुक्यातील साहित्य पुरवठा धारकांनी काल आलेल्या पंचायत राज समितीचे टिम ला निवेदन सादर करून उत्तरणीय चौकशी करून साहित्य पुरवठा धारकांचे देयके अदा करून न्याय मिळवून देतील काय?

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular