Saturday, June 25, 2022
Homeचंद्रपुरकायदेशीर कारवाईच्या पुर्ततेसाठी,चिमूर तालुक्यातंर्गत अवैध मूरुम उत्खननाची आता लेखी तक्रार दाखल!

कायदेशीर कारवाईच्या पुर्ततेसाठी,चिमूर तालुक्यातंर्गत अवैध मूरुम उत्खननाची आता लेखी तक्रार दाखल!

— महसूलमंत्री व गृहमंत्री,विभागीय आयुक्त,विभागीय पोलिस आयुक्त,जिल्हाधिकारी चंद्रपूर,जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर,उपविभागीय अधिकारी चिमूर,पोलिस निरीक्षक चिमूर,पोलिस निरीक्षक भिसी,हे खरबो रुपयांच्या अवैध मूरुम उत्खनना बाबत काय भूमिका घेतात ते अनुभव येणारच!
— अवैध मूरुम उत्खनंन प्रकरण प्रसंगानुरूप लवकरच न्यायालयात पोहचवीण्याचे सुतोवाच!
— कदाचित मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल होणार?

केवलसींग जुनी/उपक्षम रामटेके
चिमूर :-

   चिमूर तालुकातंर्गत सर्व प्रकारच्या गौण खनिजाचे अवैध उत्खनंन सर्रासपणे सुरू असताना तालुक्यातील महसूल यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.तद्वतच अवैध गौण खनिज उत्खननाच्या बाबतीत चिमूर तालुक्यातील महसूल यंत्रणा मुकी-बहिरी-आंधळी-पंगू,असंवेदनशील,अकार्यक्षम,असल्याचे दर्शन दररोज घडविते आहे.

   अवैध मूरुम उत्खननाला चिमूर तालुक्यातील महसूल विभाग मनावर घेतांना दिसून येते नाही,अवैध गौण खनिज उत्खननाला मनावर न घेणाऱ्या संबंधितांच्या अकार्यक्षम कार्यपद्धतीत नेमके काय दडले आहे,हेच गुलदस्त्यातील महाकोडे आहे.या गुलदस्त्यातील महाकोड्याला सोडविण्यासाठी म्हणजेच महाकोड्याची उकल करण्यासाठीच अवैध मूरुम उत्खननाच्या बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी बसने आवश्यक आहे व चिमूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खननाची गंभीर रित्या सखोल चौकशी होणे गरजेचे आहे असे तक्रारकर्त्यांचे कायदेशीर म्हणणे आहे.

   अवैध रित्या प्रचंड प्रमाणात होणाऱ्या गौण खनिज मूरुम उत्खननाच्या सखोल चौकशीचा उदेश ठेवूनच तक्रारकर्त्यांनी,महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात,गृहमंत्री ना.दिलीप वळसे-पाटील,विभागीय आयुक्त (महसूल) - नागपूर विभाग नागपूर,विभागीय पोलिस आयुक्त-नागपूर विभाग नागपूर,जिल्हाधिकारी चंद्रपूर,जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर,उपविभागीय अधिकारी चिमूर,पोलिस निरीक्षक-पोलिस स्टेशन चिमूर,पोलिस निरीक्षक-पोलिस स्टेशन भिसी,या सर्वांना लेखी तक्रारी दिल्या आहेत.

  सदर तक्रारीत तक्रारकर्त्यांनी आवश्यक असी इतंभूत माहिती दिली आहे व काही महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केलेले आहेत.तक्रारीतील महत्त्वपूर्ण मुद्द्यांना अनुसरून बिना विलंब सखोल चौकशी करावी,विविध भांदवी कलमान्वये संघटीत गुन्हेगारी अंतर्गत गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे सबंधीतांवर दाखल करावे,सबंधीत शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना सेवेतून बडतर्फ करावे व दंडात्मक कारवाई करावी,अशा मागण्या तक्रारकर्त्यांनी तक्रारीत नमूद केलेल्या आहेत व रेटून धरलेल्या आहेत.

    तक्रारीत नमूद केल्या प्रमाणे,तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे की,शंकरपूर-चिमूर हायवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या तिन्ही संचालकांनी,जांभुळघाट येथील रहिवासी लक्ष्मण भानुदास घाडगे,व इतर सर्वांनी प्रचंड प्रमाणात मूरुमाचा अवैध उपसा केला असून,महसूल विभागाला करोडो रुपयांचा चूना लावलेला आहे.

    चिमूर तहसीलदार संजय नागटिळक,चंद्रपूर जिल्हा खनिकर्म विभागाचे अधिकारी हे मुरुमाच्या अवैध उत्खननाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळेच संबंधित सर्वांच्या विरोधात नाईलाजपणे तक्रारी दाखल कराव्या लागल्यात,असेही तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.

    कोरोणा संक्रमण काळात संबंधित मंत्र्यांनी व अधिकाऱ्यांनी,चिमूर तालुकातंर्गत अवैध मूरुम उत्खननाची चौकशी न केल्यास तुम्ही काय भूमिका घेणार?असा प्रश्न तक्रारकर्त्यांना केला असता,त्यांनी सांगितले की,अवैध मूरुम उत्खननाचा मुद्दा एक-दोन रुपयांचा नाही तर करोडो-खरबो रुपयांच्या भ्रष्टाचारांचा आहे.या महाभयंकर अवैध मूरुम उत्खनंन भ्रष्टाचार प्रकरणाला वेळेतच महत्त्व देणे गरजेचे आहे.यामुळे प्रकरणाला कोरोणा संसर्गजन्य या विषयाची अळचण येणार नाही.देशात भ्रष्टाचारांच्या प्रकरणाला महत्त्व देत तात्काळ चौकशा सुरु झालेल्या आहेत.

  महाराष्ट्र राज्यातील जबाबदार मंत्र्यांनी व नागपूर आणि चंद्रपूर येथील जबाबदार अधिकाऱ्यांनी २१ दिवसांच्या आत चिमूर तालुकातंर्गत अवैध मूरुम उत्खननाची चौकशी लावली नाही व सबंधीतांवर चौकशी अंती संघटित गुन्हेगारीला अनुसरून फौजदारी कारवाई व दंडात्मक कारवाई केली नाही तर मुंबई उच्च न्यायालयाच्या माननीय नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सुतोवाच सोडले आहे.

  तक्रारकर्त्यांनी बातमी मध्ये नाव प्रशिध्द करण्यास मनाई केली आहे.तक्रारकर्त्यांना नावापेक्षा,अवैध मुरुम उत्खनंन प्रकरणाची चौकशी महत्वाची वाटते आहे.मात्र चिमूर तालुकातंर्गत अवैधपणे मूरुमाचे होणारे प्रचंड प्रमाणात उत्खनंन गंभीरच आहे.
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular