Sunday, May 29, 2022
Homeचंद्रपुरकराचा भरणा न केल्यास पथदिवे बंद होणार

कराचा भरणा न केल्यास पथदिवे बंद होणार

नांदा ग्रामपंचायतीचे आव्हान

गडचांदुर- मो.रफिक शेख –
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून नांदा ग्रामपंचायतीची ओळख आहे येथील नागरिकांकडे गृहकर , स्वच्छता कर , पाणीकराचे जवळपास ४५ लाख रुपये थकीत आहे नागरिकांनी थकीत कराचा भरणा न केल्यास पथदिवे बंद होणार आहेत थकीत कराचा भरणा तात्काळ करण्याचे आव्हान नांदा ग्रामपंचायतीने केले आहे.

कोरपना तालुक्यातील नांदा ग्रामपंचायतीचे कर आकारणी नोंदवहीत जवळपास २४०० घरे व खाली जागेची नोंद आहे मूलभूत सोयीसुविधा जसे रस्ते , नाल्या , पाणी , साफसफाई ग्रामपंचायतीकडून पुरविल्या जाते याकरिता शासन नियमानुसार नागरिकांकडून विविध कर आकारला जातो येथील नागरिकांकडे गृहकर स्वच्छता कर व पाणी कराचे ४५ लाख रुपये थकीत आहे नागरिक वेळेत कराचा भरणा करीत नसल्याने श्रीमंत ग्रामपंचायतीला आर्थिक घडी बसविणे अवघड झाले आहे यापूर्वी पथदिव्यांचे विद्युत बिल जिल्हा परिषदेकडून भरले जात होते चौदाव‍ा व पंधरावा वित्त आयोगाचे धोरणानुसार जिल्हा परिषदेच्या निधीला शासनाने कात्री लावत निधी थेट ग्रामपंचायतीला वळता केला आहे काही दिवसांपूर्वी पंधरावा वित्त आयोगातून पथदिव्यांचे विद्युत बिलांचा भरणा ग्रामपंचायतीने करावा असा शासन निर्णय काढण्यात आला आहे परंतु अनेक ग्रामपंचायतीने पंधरा व्या वित्त आयोगाचा निधी इतर विकासकामांकरिता खर्च केला आहे नांदा ग्रामपंचायतीला
महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीने पथदिव्यांचे वीजबिल न भरल्यास पथदिवे बंद करण्याची नोटीस बजावली आहे पंधरावा वित्त आयोग निधी कमी शिल्लक असल्याने नांदा ग्रामपंचायतीला पथदिव्यांचे बिलाचा भरणा करणे शक्य नाही येथील नागरिकांकडे विविध करांचे ४५ लाख रुपये थकित आहे नागरिकांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करून तातडीने कराचा भरणा केल्यास पथदिव्यांचे वीजबिल भरता येणार आहे थकीत कर तात्काळ जमा करण्याचे आव्हान नांदा ग्रामपंचायतीचे प्रशासक दिलीप बैलनवार व सचिव पंढरीनाथ गेडाम यांनी नागरिकांना केले आहे कराचा भरणा न केल्यास पथदिवे बंद होणार आहे

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular