Sunday, May 29, 2022
Homeचंद्रपुरओपन स्पेस सौंदर्य करण्याच्या नावाने लाखों रुपयांचा चुराडा

ओपन स्पेस सौंदर्य करण्याच्या नावाने लाखों रुपयांचा चुराडा


गडचांदुर : गडचांदुर शहर ओपन स्पेस सौंदर्यीकरण योजने अंतर्गत शहरातील ओपन स्पेस वर मिनी जिम व लहान मुलांच्या खेळ साहित्याची व्यवस्था करण्यात आली होती. या योजने अंतर्गत लहान मुलांच्या खेळ साहित्यावर व ग्रीन जिमवर शासनाकडून प्राप्त निधितुन लाखों रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.

परंतू नगर परिषद कडून सबंधित ओपन स्पेस वर हे खेळ साहित्य अक्षरशः टाकून देण्यात आले. सदर साहित्य मांडतांना सभोवताली सुरक्षेसाठी कुंपण तसेच लहान मुलांना सुरक्षेच्या दृष्टीतून मैदान समतल करण्यासारख्या गोष्टींना प्राधान्य देण्यात आले नाही . त्यामुळे मागील दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे या ठिकाणी पाणी जमा झाले आहे. या पाण्यातून व चिखलाला तुडवून लहान मुले या खेळ साहित्याकडे जात असताना चे चित्र दिसून येत आहे. या चिखलातून पाय घसरुन लहान मुलांना गंभीर दुखापत होऊ शकते याची सुद्धा नगर परिषद ला जाणीव नसणे दुर्दैवी आहे.
वास्तविक पाहता ओपन स्पेसवर मैदान समतल करून या साहित्याची मांडणी करणे आवश्यक होते. परंतू नगर परिषद ने या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. या खेळ साहित्य असलेल्या ठिकाणी कुंपण घालून किंवा इतर प्रकारे
या साहित्याची देखभाल करणे व संबंधित साहित्याला सुरक्षा प्रदान करणे आवश्यक आहे या मागणीला अनुसरुन प्रभाग क्रमांक एक मधील रहिवासी, सावित्रीबाईं फुले कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्रा. जहीर सैय्यद यांनी नगर परिषद गडचांदुरला संबंधित मागण्यांना अनुसरुन निवेदन दिले आहेत. या निवेदनात त्यांनी ओपन स्पेसवर मैदान समतल करणे, खेळ साहित्य असलेल्या ठिकाणी कुंपण घालून किंवा इतर प्रकारे
या साहित्याची देखभाल करणे व संबंधित साहित्याला सुरक्षा प्रदान करणे इत्यादी मागण्या केल्या आहेत.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular