भारतीय जनता युवा मोर्चा ब्रह्मपुरी तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.
ब्रह्मपुरी :
३० जानेवारी २०२१ ला पुण्यातील एल्गार परिषदेत येऊन अलिगढ मुस्लिम विश्वविद्यालयाचा विद्यार्थी नेता शर्जील उस्मानी याने देशातील संपूर्ण हिंदू समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्याने, ‘आजचा हिंदू समाज हा सडलेला आहे” असे जहर ओकून जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या कृत्यामुळे सर्जील उस्मानी वर २९५ (अ) व इतर गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चा ब्रह्मपुरीच्या वतीने करण्यात आली.

याआधी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांच्या माध्यमातून झालेल्या पाठपुराव्यानंतर पोलीसांनी सर्जील उस्मानी या वर एफआयआर दाखल करत कलम १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला. परंतु सदर प्रकार हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्यांच्यावर २९५ (अ) व इतर तत्सम गुन्हे दाखल करणे अपेक्षित होते. परंतु तसे करण्यास पोलीस विभागाने टाळाटाळ केली. या शिवाय सर्जील उस्मानी ला अटक करण्याची गरज नाही, अशी भूमिका राज्य सरकारने न्यायालयात ठेवली. अशा कारणांमुळे आजही उस्मानीला अटक करण्यात आली नाही. या मुळे उस्मानी यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्याची भारतीय जनता युवा मोर्चा ब्रह्मपुरीच्या वतीने करण्यात आली.
या प्रसंगी भाजपा शहर महामंत्री मनोज भूपाल, साकेत भानारकर, भा.ज.यु.मो जिल्हा उपाध्यक्ष तथा पं. स सदस्य प्रकाश नन्नावरे, जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा कार्यकरिणी सदस्य लिलाराम राऊत, शहर महामंत्री स्वप्नील अलगदेवें, उपाध्यक्ष अमित रोकडे, उपाध्यक्ष प्रमोद बांगरे, क्रिष्णा वैद्य, सदाशिव ठाकरे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.