Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरएन.टी.पी.सी. ते श्रीरामनगर पर्यंत सर्व्हिस रोड तथा स्ट्रीट लाईन लावण्यासाठी भद्रावती भिम...

एन.टी.पी.सी. ते श्रीरामनगर पर्यंत सर्व्हिस रोड तथा स्ट्रीट लाईन लावण्यासाठी भद्रावती भिम आर्मीचे गृहमंत्र्यांना निवेदन

भद्रावतीभद्रावती शहरातील सुमठाना ते पावर ग्रीड रेल्वे गेटपर्यंत हायवेवर सर्व्हिस रोड व स्ट्रीट लाईनची व्यवस्था नसल्याने या भागात येजा करणाऱ्या नागरिकांना व विशेषता लहान मुलांना प्रत्यक्ष हायवेवरून जानेयेणें करावे लागत असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

येथील सर्व्हिस रोड नसल्याने या भागात आजपर्यंत अनेक अपघात झाले असून त्यात निरपराध नागरिकांच्या बळी गेला आहे. या हायवेवर भद्रावती शहर ते श्रीरामनगर पर्यत सर्व्हिस रोड आहे. त्यामुळे नागरिकांची अडचण लक्षात घेवून श्रीरामनगर ते पावर ग्रीड रेल्वे फाटका पर्यंत सर्व्हिस रोड तयार करून त्यावर पथदिव्याचे सुविधा द्यावी. या मागणीचे निवेदन भिम आर्मी भारत एकता मिशनचे जिल्हा अध्यक्ष शंकर मून यांच्या नेतृत्वात राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांना देण्यात आले.
निवेदन सादर करतेवेळी भिम आर्मीचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular