(प्रशांत राऊत)
अर्हेरनवरगाव:-
महाराष्ट्र राज्यातील सर्व सरपंचासाठी कार्यरत असलेल्या, सरपंच सेवा संघाच्या वतीने शिर्डी येथील हॉटेल जे.के.पॅलेस मध्ये दि.२२ जानेवारी शुक्रवारला राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा “मान कर्तृत्वाचा_सन्मान नेतृत्वाचा” आयोजित करण्यात आला होता.

यामध्ये राज्यातील सामाजिक, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी अश्या विविध प्रकारच्या क्षेत्रातील उल्लेखनीय लोकांची योग्य ती निवड करून, त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सदर सन्मान सोहळ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीचे युवा नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते मा.उदयकुमार सुरेश पगाडे यांना “राज्यस्तरीय युवारत्न पुरस्कार-२०२१” देऊन सन्मानित करण्यात आले असून पगाडेंनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.सदर सन्मान सोहळ्याला शिर्डी मतदार संघाचे खासदार मा. सदाशिव लोखंडे, प्रख्यात समाज प्रबोधनकार मा.निवृत्ती इंदोरीकर महाराज, सरपंच सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस मा.बाबा पावसे व इतर मान्यवर उपस्थित होते.