Monday, June 27, 2022
Homeचंद्रपुरआसन खुर्द येथील घटना मुलाने जाळले वडिलांचे घर

आसन खुर्द येथील घटना मुलाने जाळले वडिलांचे घर

कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे

कोरपना तालुक्यातील आसन खुर्द येथे शनिवारी सकाळी आपल्या वडिलांचे घर जाळून मुलांनी स्वतः आत्महत्या घेतल्याची घटना घडली तर रामा मारुती पेंदोर वय तीस राहणार इंदापूर असे अत्यवस्थ असलेल्या मुलांचे नाव आहेत सकाळच्या सुमारास मुलगा रामा पेंदोर याने वडील मारुती पेंदोर यांच्याशी ईजापूर येथे भांडण केलेत वडिलाला जीवे मारण्यासाठी तो हातात कुर्‍हाड घेऊन फिरत होता दरम्यान आसन खुर्द येथे येऊन मुलाने रागाच्याभरात वडीलांचे घर आग लावून पेटवून दिले त्यात घर जळून सर्व वस्तू साहित्य भस्मसात झाले गावापासून दूर असल्यामुळे ती आग इतरत्र पसरली नाहीत नंतर अग्निशमन वाहन बोलाविण्यात आलेत तेव्हापर्यंत घर जळून खाक झाले होते सुरु असलेली आग विझवली प्राप्त माहितीवरून गडचांदूर चे ठाणेदार गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनात गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली तेव्हा आरोपी कुऱ्हाड हाती घेऊन होता त्याने उंदीर मारायचे औषध खाल्ल्याचे दिसून आले लगेच दुपारी दोन वाजता पोलिसांनी त्याला उपचारासाठी गडचांदूर येथे नेण्यात आले आरोपि रामा च्या भीतीने आई वडील इंजापूर गाव सोडून आसन खुर्द येथे मागील दोन वर्षात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होते तरीही तो मारहाण करीत असल्याचे वडिलांनी सांगितले वृत्त लिहीपर्यंत मुलांची प्रकृती चिंताजनक होती

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular