Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरआम आदमी पार्टी चा जिवती येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न

आम आदमी पार्टी चा जिवती येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न

जिवती:-आम आदमी पार्टी जिवती येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला.यावेळी जिल्हा अध्यक्ष श्री. सुनिल देवराव मुसळे, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे , जिल्हा कोषाध्यक्ष श्री.भिवराज सोनी , राजुरा विधानसभा प्रमुख श्री. प्रदिप बोबडे , तसेच RTI पदाधिकारी श्री.सुर्यकांत चांदेकर , जिवती तालुका अध्यक्ष श्री.मारूती पुरी, सचिव गोविंद गोरे, उपाध्यक्ष सुनील राठोड, श्री.हरिचंद्र जाधव युवाध्यक्ष अक्षय शेळके, युवाउपाध्यक्ष बालाजी मस्के, श्रीराम सानप,उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष श्री सुनील मुसळे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आम आदमी पार्टी निवडणुका लढणार असल्याच्या अनुषंगाने जिवती तालुक्यातील येणाऱ्या ग्रामपंचायत,नगरपंचायत, पंचायत समिती,जिल्हापरिषद,निवडनुका चे ऊद्दिष्ट समोर ठेऊन वाटचाल सुरु केली आहे.आम आदमी पार्टी ही दिल्ली मॉडेल जनतेसमोर ठेऊन, निवडनुका लढत आहे. त्यामुळे जनतेकडून ही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याने यावेळी आम आदमी पार्टी पूर्ण ताकतीने निवडणुका “लढेल व जिंकेल” असा विश्वास श्री. मुसळे यांनी व्यक्त केला. यावेळी “हमे पूर्ण स्वराज्य चाहिये”,”इन्कलाब जिंदाबाद”,”लढेंगे और जितेंगे” चे नारे आम आदमी पक्षात अनेक नवीन कार्यकर्ताने ही पार्टीत प्रवेश केला. यावेळी श्री. किसन सानप,पांडुरंग होडबे, गजानन सलगर, सीताराम कवडे, सुमेध दवणे,श्री.चरक, भास्कर, अक्षय कवडे,रंगराव जाधव,नामदेव जाधव(चिकिस्तलय डॉक्टर), प्रवीण पवार,विठ्ठल पवार, रवींद्र करमनकर,दयानंद पुरी, माणिकराव कोडापे,माणिकराव कोडापे, मारोती कोडापे,गोविंद भारती,बालाजी इरपे, तसेच अनेक कार्यकर्ते यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular