कोरपना प्रतिनिधी :-
गडचांदूर नगर परिषद तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते वन विभागाचे कार्यालय ते शौचालय पर्यंत सिमेंट काँक्रीट नालीचे बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दिपक वरभे यांनी करीत संबंधित विभागाचे मंत्री व अधिकारी यांना लेखी तक्रार दिली आहे.

नगरपरिषद गडचांदूर तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते फॉरेस्ट ऑफिस ते शौचालय पर्यंत सिमेंट काँक्रेट नाली बांधकाम सध्या सुरु असून सदर कामाचे अंदाजपत्रकात त्रुटी असल्याने यापूर्वी हे काम काही दिवस बंद होते.
काम पुन्हा सुरु झाल्यानंतर करणाऱ्या ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जचे काम केले असून आधी नालीची भिंत बनवितांना लोखंडी सलाख कमी वापरण्यात आली. परिसरातील नागरिकांनी तक्रार केल्यावर सिमेंट काँक्रेट मध्ये लोखंडी सलाख चक्क वरुन ठोकून टाकण्यात आली.(अश्या प्रकारे लोखंडी रॉड टाकण्याची बहुदा हि संपूर्ण देशात पहिली घटना असावी) आधी सदर नाली हि ६ फूट खोल होती परंतु ठेकेदाराने आपले कॉंक्रिट व लोखंडी सलाख इत्यादी साहित्य वाचविण्या करिता सदर नाली हि फक्त २ फूट खोल केलेली आहे . हि नाली गावातील मुख्य नाली असून सुमारे ३५% लोकवस्तीचे पाणी वाहून नेत असते. पावसाळ्यात नालीच्या तोंडावर बरेच पाणी साचत असल्याने नगर परिषद ने या नाली चे सिमेंट कॉंक्रिट मोठ्या नाल्यात रूपांतर करण्याकरिता रुपये ६२ लाख खर्च करण्याचे काम प्रस्तावित केले परंतु सध्या ठेकेदाराने ६ फूट खोल नालीचे रूपांतर २ फूट नालीत केले आहे.त्या मुळे पुढे पावसाळ्यात शिवाजी चौकात मोठा तलाव निर्माण होण्याची पूर्ण शक्यता आहे. मागे असे बरेचदा झालेले हि आहे. त्या मुळे प्रभाग ६ येथील लोकवस्तीत पाणी घुसून लोकांचे मालमतेची हानी होणार आहे व तसे झाल्यास त्याची सर्वस्वी जवाबदारी नगरपालिकेची राहील. काम सुरु असतांना व्हायब्रेटर मशीन वापराने आवश्यक असतांना ती वापरण्यात आली नाही. सोबतच सिमेंट चे प्रमाण सुद्धा कमी आहे. सलाख ही सुद्धा ५०० टीएमटी ची नसून ४५० टीएमटी ची वापरण्यात येत आहे. सोलींग आणि बेड कॉंक्रिट सुद्धा अंदाजपत्रक प्रमाणे नाही. नालीच्या भिंती सुद्धा २००मीमी च्या नाहीत सोबतच रुंदी सुद्धा कमी आहे.
नाली चे काम ज्या पद्धतीने सुरु आहे त्या मुळे पुढे या नालीतून जुन्या नालीपेक्षाही कमी पाणी वाहुन जाणार आहे त्या मुळे जनतेला नाहक त्रास होणार आहे व जनतेचा पैसे वाया जाणार आहे.
या कामावर नगर परिषद चे अभियंता यांचे बिलकूल लक्ष नसून जाणीवपूर्वक बांधकाम अभियंता निकृष्ट कामाला प्रोत्साहन देत आहेत. त्या मुळे आपण सदर कामावर नियंत्रण ठेवण्याकरिता इतर नगर परिषद चे बांधकाम अभियंत्याची नियुक्ती करणे आवश्यक आहे. चेंबर बनवितांना अंतर एकलग नसून कुठे जास्त तर कुठे अत्यंत कमी अंतर ठेवण्यात येत आहे. त्या मुळे नाली सफाई करण्याची सुद्धा पुढे अडचण निर्माण होणार आहे .
करिता सादर नाली बांधकामाची मौका चौकशी करणे आवश्यक झाले असून त्या बाबत कारवाई करणे आपल्या कार्यालयातून अपेक्षित आहे. आपण इतर नगर परिषद चे बांधकाम अभियंत्या कडून सदर कामाची पाहणी करून भ्रष्टाचाराची चौकशी करावी अन्यथा या भ्रष्टाचाराबाबत न्यायालयात दाद मागावी लागेल. अशी तक्रार नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, प्रधान सचिव, नगर विकास मंत्रालय मुंबई, व जिल्हा नगर विकास प्रशासन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर यांना दिलेल्या तक्रारीत वरभे यांनी आरोप केले आहे.
======+=+========+++
पहिल्यांदा झालेले काम व्यवस्थित न दिसल्याने ठेकेदाराला पत्र दिले आहे. झालेले बांधकाम पाडुन परत नव्याने बांधकाम सुरू केले आहे.
डॉ विशाखा शेळकी
मुख्याधिकारी नगरपरिषद गडचांदूर