Monday, June 27, 2022
Homeचंद्रपुरअवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर प्रशासनाची धडक कारवाई

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर प्रशासनाची धडक कारवाई


 28 ट्रॅक्टर व एक पोकलँड मशीन जप्त
 4,20,640 रुपये दंड वसूल
चंद्रपूर, : जिल्ह्यात 11 ते 15 जानेवारी दरम्यान अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाच्या भरारी पथकाद्वारे धडक कारवाई करत तब्बल 28 ट्रॅक्टर तसेच एक पोकलँड मशीन व व्यागन ड्रिल मशीन जप्त करण्यात आली आहे.


दिनांक 11 जानेवारी रोजी दुपारी 03 वाजता जिल्हा खनिकर्म अधिकारी, खनिज विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथील जिल्हा भरारी पथकाने भेट दिली असता ईराई व झरपट नदीच्या पात्रात अवैध माती मिश्रित रेती वाहतूक होत असल्याचे आढळून आले. सदर वाहानाची तपासणी करण्यात येवून विना परवाना रेती वाहतूक करणार्याव वाहन ट्रक्टर क्र. MH 34-F 0550, MH 34-F 615, MH 34-AP 1140, MH 34-F 166 असे एकूण 04 ट्रक्टर जप्त करून सचिन भालचंद्र दुधे, पोलिस पाटील आरवट ता.व जि. चंद्रपूर यांचे कडे सुपूर्दनाम्यावर सुपूर्द करण्यात आलेले आहे. उक्त वाहानावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता -1966 च्या कलम 48 च्या पोट कलम (7) (8) च्या तरतुदीअन्वये दंडात्मक कार्यवाही करून रु. चार लाख वीस हजार सहाशे चाळीस दंडाची रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
दिनांक 14 जानेवारी रोजी सकाळी 05 वाजता तालुका भरारी पथकाने वर्धा नदीच्या हल्ल्या घाटावऱ धाड टाकून अवैध रेती वाहतूक करणार्याी एकूण 24 ट्रक्टर जप्त सदर वाहनावर करून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता -1966 च्या कलम 48 च्या पोट कलम (7) (8) च्या तरतुदीन्वये दंडात्मक कार्यवाही करणे सुरू आहे.
दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा खनिकर्म अधिकारी, खनिज विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथील जिल्हा भरारी पथकाने भेट दिली असता मौजा पांझुर्णी ता. वरोरा येथील सर्व्हे नंबर 122 मध्ये दगड या गौण खनिजाचे विना परवाना अवैध उत्खनन होत असल्याचे आढळून आले. विना परवाना अवैध उत्खनन वाहतूक करणार्याे पोकलँड मशीन ZAXTS-120 H हायवा क्र. MH-13 CU6067 व एक व्यागन ड्रिल मशीन जप्त करण्यात आली. उक्त वाहानावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता -1966 च्या कलम 48 च्या पोट कलम (7) (8) च्या तरतुदीअन्वये पुढील दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी कळविले आहे.
0000

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular