Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरअवैद्य चोरीने रेती वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकी चालक ठार

अवैद्य चोरीने रेती वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकी चालक ठार


ब्रह्मपुरी-

निलज येथील स्वतःच्या शेती वरून खरकाडा येथे स्व गावी परत येत असताना अचानक अवैद्य चोरीने रेती वाहतूक करणाऱ्या एका नामवंत रेती तस्करांच्या ट्रॅक्टरने खरकाळा येथील धर्मराज पटवारी दोनाडकर वय तीस वर्ष याला ट्रॅक्टरने जबर धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

सदर घटना रूई विद्यानगर जवळ दिनांक आठ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसात वाजता घडली सदर ट्रॅक्टर चालक रोशन मधुकर दुपारे रुई याला पोलिसांनी अटक केली असून सदर घटनेचा तपास ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मलिकाअर्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कुमरे साहेब व त्यांचे सहकारी करत आहेत ब्रह्मपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैद्य धंद्याला उत आला असून रेती तस्कर मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करांच्या बेधुंद ट्रॅक्टर चालवित असल्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्या लोकांसाठी धोकादायक आहेत अशी अवैध वाहतूक करणाऱ्या रेती तस्करांवर कारवाई करावी अशी मागणीही परिसरातील जनतेकडून होत आहे

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular