Saturday, June 25, 2022
Homeचंद्रपुरअर्हेरनवरगाव येथे रोहयो च्या माध्यमातून शेकळो लोकांना मिळाले काम

अर्हेरनवरगाव येथे रोहयो च्या माध्यमातून शेकळो लोकांना मिळाले काम

हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य
(प्रशांत राऊत)
ब्रह्मपुरी:-
महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजनेतून जिल्हा परिषद चंद्रपुर तर्फे व पंचायत समिती ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या अर्हेरनवरगाव ग्रामपंचायतींच्या वतीने (एम आर जी एस) अंतर्गत ८ लाख ४० हजार रुपयाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून जवळजवळ ५२० मजूर काम करणार आहेत .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच रोजगार बंद होते त्यामुळे कित्तेक हातावर पोट असणाऱ्या मजुनांवर उपासमारीची वेळ आली त्यामुळे खायचे काय? व जगायचे कसे? असे अनेक प्रश्न हेळसावत होते.

पण ग्रामपंचायत च्या पुढाकाराने रोजगार हमी येजनेच्या माध्यमातून शेकळो गाववासीयांच्या हाताला काम मिळाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे त्यामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या मजुरांमध्ये तरुण शिक्षित युवकांचा देखील समावेश आहे. सदर कामाचे भूमिपूजन ९ जून रोजी अर्हेरनवरगाव ग्रामपंचायत च्या सरपंच सौ दामिनी जागेश्वर चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच जितेंद्र कऱ्हाडे,ग्रामपंचायत सचिव राजू कुरेकार,ग्रा.पं.सदस्य प्रतिभा राऊत येशुका कुथे,ज्ञानेश्वरी ठेंगरे,आदी ग्रा.पं. सदस्य व कामगार वर्ग उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular