रा.काँ समर्पित 8,भाजपा समर्पित 2, युवा परिवर्तन पॅनल 3 सीट
(प्रशांत राऊत)
अर्हेरनवरगाव :- ब्रम्हपुरी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचा बलेकिल्हा समजल्या जाणाऱ्या अर्हेरनवरगाव येथे तेरा सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर झाला या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी समर्थित उमेदवारांनी आठ जागेवर विजयी मिळवत ग्राम पंचायत वर झेंडा रोवला .

तेरा जागेकरिता राष्ट्रवादी, भाजप, हनुमान देवस्थान मंदिर प्रणित युवा परिवर्तन पॅनल व प्रहार समर्थित पॅनलनि निवडणूक रिंगणात उमेदवार उतरविले होते मात्र यात राष्ट्रवादी समर्थित पार्टीचे 8 उमेदवार विजयी झाले तर भाजपा समर्थित पार्टी चे 2 हनुमान देवस्थान मंदिर प्रणित युवा परिवर्तन पॅनलचे 3 उमेदवार निवडून आले तर नव्यानेच निवडणूक रिंगणात उतरलेल्या प्रहार समर्थित पार्टीला खाते उघडता आले नसल्याने बत्ती गुल झाल्याचे निकालानंतर दिसून आले.

राष्ट्रवादी समर्थित गटातून संजय नामदेव ठेंगरें (वार्ड न. 3 ), प्रवीण मारोती दाणी (वार्ड न. 3 ), यामिनी जागेश्र्वर चौधरी (वार्ड न. 3 ), यशोका हरीचंद्र कऱ्हाडे (यशोका संतोष कुथे ) ( वार्ड न.1), सुनीता दिगांबर मडावी ( वार्ड न.1), जितू बाबुराव कऱ्हाडे ( वार्ड न.5), ज्ञानेश्वरी मनोज ठेंगरे ( वार्ड न.5), प्रतिभा प्रकाश राऊत ( वार्ड न.2), विजयी झाले तर भाजपा समर्थित विजयी उमेदवार श्रीकांत पिलारे ( वार्ड न.2), सविता राहुल देवढगले ( वार्ड न.2), तर हनुमान देवस्थान मंदिर प्रणित युवा परिवर्तन पॅनल विजयी उमेदवार चंद्रकांत अवदुत गाताडे ( वार्ड न.4), सरिता अशोक उरकुडे ( वार्ड न.4), निशा बाळकृष्ण ठेंगरे ( वार्ड न.4), हे विजय उमेदवार असून प्रहार संघटना समर्थित उमेदवार खाता न खोलताच पराजित झाले.
संजय नामदेव ठेंगरें हे १९९५ पासून ग्राम पंचायत निवडणुक लढवीत असून एकदाही त्यांचा पराभव झाला नसून विजयाची शृंखला कायम ठेवली आहे .तर भारतीय जनता पार्टीचे श्रीकांत पिलारे हे सर्वाधिक मत घेऊन विजयी झाले असून अर्हरनवरगाव येथे राष्ट्रवादी समर्थित उमेदवारानी आपला झेंडा रोवल्याने राष्ट्रवादी समर्थित उमेदवार , कार्यकर्ते तसेच गावकरी मंडळीत जल्लोष दिसून येत आहे निवडून आलेल्या उमेदवारांनी गावाच्या विकासाकडे जातीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करीत गावकरी मंडळीनि विजयी उमेदवारांना शुभेच्या दिल्या.