Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरअमराई येथील निराधार महिलेचे घर जळाले

अमराई येथील निराधार महिलेचे घर जळाले

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची तात्काळ आर्थिक मदत

घुग्यूस प्रतिनिधी

घुग्गुस येथील अमराई वार्डात झोपडीत राहणाऱ्या भगरताबाई भीमराव सिडाम (65) यांच्या घराला अचानक घरातील विद्युत शॉक सर्किट मुळे आज मंगळवारला सकाळी 10 वाजता दरम्यान आग लागली. आगीत नगदी 5 हजार, कपडे, चादर, घराचे लाकडी फाटे, धान्य, आधारकार्ड कागदपत्रे संपूर्ण जाळून खाक झाली.
आग लागल्याचे दिसताच शेजारील नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग विझविली व घराच्या आतील ग्यास सिलेंडर बाहेर काढले सुदैवाने ग्यास सिलेंडर चा स्फोट झाला नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली सिलेंडर चा स्फोट झाला असता तर शेजारील घरे स्फोटात उडाली असती व मोठी जीवित हानी झाली असती.
निराधार भगरताभाई ही आज सकाळी 9:30 वाजता कापूस वेचण्यासाठी शेतात बाहेर गेली होती. घराला आग लागल्याची माहिती ऑटो चालकास शेजाऱ्यांनी दिली माहिती मिळताच ती त्याच्या सोबत घरी परत आली.

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांना माहिती मिळताच अमराई येथील झोपपट्टीत राहणाऱ्या निराधार महिला भगरताबाई यांच्या घरी जाऊन भेट दिली व त्यांची विचारपूस केली आणि भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व भाजपा युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे तलाठी दिलीप पिल्लई यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून घर जळल्याची माहिती दिली व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी तात्काळ आर्थिक मदत दिली.

आर्थिक मदत मिळताच निराधार भगरताबाई ने भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे आभार मानले.

यावेळी घरा शेजारील विद्या आत्राम, पूनम वाघमारे, उषा कार्लेकर, विद्या रामटेके, पार्वत पारशिवे, भागर्ता तुराणकर,सुनंदा लिहीतकर, स्वप्नील इंगोले, विनोद जिंजर्ला, असगर खान, वंमशी महाकाली, अनिल बांदूरकर, मोहनिश हिकरे, उमेश दडमल उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular