Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरअज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार एक गंभीर जखमी

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार एक गंभीर जखमी

ब्रम्हपुरी:–तालुक्यातील कहाली ते चांदली दरम्यान असलेल्या निर्मला माता मंदिराजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना दि 14 जानेवारी गुरुवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली आहे


प्राप्त म्हणजे नुसार सदर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव सिद्धार्थ संभा बनकर (50) असून ब्रम्हपुरी तालुक्यातील कालेता येथील रहिवासी आहे तर गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव रोशन मनोहर मडकाम (29) असून नागभीड तालुक्यातील रेंगातूर येथील रहिवासी आहे.


.

गुरुवारी सकाळी दोघेही मोटारसायकलने कालेता येथून ब्रम्हपुरीला यायला निघाले असता चांदली आणि कहाली दरम्यान असलेल्या निर्मला माता मंदिराजवळील नागमोडी वळणावर अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा पूर्णतः चेंदामेंदा होऊन मृतकाचे डोके धडापासून वेगळे झाले घटनास्थळी रक्ताचा सदा पडला होत तर गंभीर जखमी झालेल्या इसमाच्या दोन्ही पायाला जबर दुखापत झाली असून एक पाय तुटले त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्वरित गडचिरोली येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे सदर अपघाताची माहिती ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला मिळताच पोलिस उपनिरीक्षक राजेश उंदिरवाडे, अरुण पिसे या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतकाचे शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असून अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular