Tuesday, April 16, 2024
Homeवर्धानंदी बैलाची किंमत एक लाख

नंदी बैलाची किंमत एक लाख


सतीश राऊत कलाकार ; अनेक मूर्ती बनविण्याचा हातखंडा

रविराज घुमे
वर्धा :
कला आत्मसात करून अनेक मूर्तिकार वेगवेगळ्या मूर्ती काढून प्रसिध्दी झोतात येत आहे.तर ग्रामीण भागात अत्यंत कुसर कलाकृती काढणारे मात्र दुर्लक्षित आहे .म्हसाळा येथील एका तरुण कलाकाराने सागाच्या लाकडा पासून नंदी तयार केला.त्या नंदी ला किंमत 1 लाख रुपयात विकला गेला .
म्हसाळा येथील या तरुणाने गेल्या तीन वर्षांपासून नंदी बैल बनविण्यास सुरुवात केली .दर वर्षी दोन ते तीनच नंदी बैल तयार करून बाजारात विकल्या जाते .यावर्षी दोन नंदी बनविले, एक नंदी बनवायला चार महिने लागले,या बैलाची किंमत एक लाख रुपये असून तो नंदी राळेगाव तालुक्यातील रावेळी येथील देविदास येकोनकार यांनी विकत घेतला आहे.


या नंदी बैल शिवण सागपासून बनविला आहे.त्याची उंची साडेचार फूट आहे.

अशी सुचली कला

गावात एका शेतकऱ्यांचे बैलाचे जु तुटले ते त्यांनी नवीन बनवून देण्याचे कबूल केले .मात्र शेतकऱ्याचा विश्वास बसला नाही लाकूड देऊन पैसे देणार नाही असे स्पस्ट शेतकऱ्याने सांगितले .त्या लाकडापासून जु तयार केले आणि शिल्लक लाकडापासून नंदी करण्याचे काम सुरू केले.लाकडाला कोरता कोरता आकार येत गेला आणि नंदी बैल तयार केला तेव्हा पासून लाकडी नंदीबैल तयार करीत आहे असे सतीश राऊत यांनी सांगितले .


सतीश नंदीबैल शिवाय इतर मूर्ती बनविण्याचे काम करतो शंकरजी,श्रीकृष्ण, गरुड आदी मूर्ती बनविल्या आहे .तो सेवाग्राम येथील ओद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात मूर्ती तयार करीत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular