Friday, March 29, 2024
Homeवर्धादि.26/09/2021 ते 02/10/2021 या सात दिवसीय व्यवसायिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

दि.26/09/2021 ते 02/10/2021 या सात दिवसीय व्यवसायिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन


वर्धा : येथील गौरीशंकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था व क्रीडा युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा यांच्या सहकार्याने युवतींसाठी स्वयंरोगार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन नगरपरिषद बचत गट मॅनेजर चित्राताई चाफले व कौशल्य विकास विभाग सौ ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष लिटिल स्टार कांव्हेंट अध्यक्ष बुशरा पठाण होत्या. सन शाईन स्कूलच्या अध्यक्ष आझमी तबस्सुम ,गोसिया नियाजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
युवतींना स्वयंरोजगारासबंधी विविध विषयावर मार्गदर्शन केले.व्यवसाय करण्यासाठी कौशल्य किती गरजेचे असते याची सविस्तर माहिती दिली.
शिबिरामध्ये विविध व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वतःचा व्यवसाय करून सक्षम बनावे यावर जास्त भर देण्यात आला.प्रशिक्षणाला अनुभवी प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती प्रशिक्षणामध्ये शिवण काम, मास्क शिवणे, कापडी बॅग,पेपर बॅग,मेहंदी काढणे,संस्कार भारती रांगोळी इ.विषयांवर मार्गदर्शन केले.शिबिरात नवरात्र महिला बचत गट व इतर युवतींचा समावेश होता.
आमचे प्रेरणा स्थान महात्मा गांधीचा आत्मनिर्भर देश व सावित्रीबाई फुले यांनी महिलांना सुशिक्षित करण्यासाठी दिलेले योगदान यांचा कर मेळ साधण्याचा प्रयत्न केला तर खरचं आत्मनिर्भर देशाचे स्वप्न साकार होईल असे मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
शिबिराचे समारोप महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त करण्यात आले.यातून प्रेरणा घेऊन युवतींनी व्यवसाय करण्याची व आत्मनिर्भर बनण्याची हमी देण्यात आली.शिबिराचे आयोजन गौरीशंकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था सचिव श्रीमती लताताई होलगरे यांनी केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular