Thursday, March 28, 2024
Homeभंडारापालांदूर पोलिस ठाण्यातील गुप्तचर यंत्रणा कुचकामी

पालांदूर पोलिस ठाण्यातील गुप्तचर यंत्रणा कुचकामी

अपघाताच्या घटनेचा सुगावा लागला नाही
लाखनी :- पालांदूर पोलिस ठाण्याचे हद्दीतील एका गावात ट्रॅक्टर कालव्यात पडून झालेल्या अपघातात २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. नातेवाईकांनी अपघाताची माहिती पोलिसांना न देता रात्रभर मृतदेह घरी ठेवून दुसरे दिवशी सकाळी अंत्यसंस्कार केले. पोलिस ठाण्याची स्वतःची गुप्तचर यंत्रणा असून प्रत्येक गावात पोलिस पाटील , कोतवाल आणि मुखबिर(खबरी) असताना या घटनेचा पालांदूर पोलिसांना सुगावा न लागणे म्हणजेच पालांदूर पोलिस ठाण्यातील गुप्तचर यंत्रणेचे हे अपयश असल्याच्या तालुक्यात चर्चा होत आहेत.


पालांदूर पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्रात असलेल्या किटाडी बिटातील एका गावातील एका शेतकऱ्याची शेतजमीन गोसेखुर्द प्रकल्पाकरिता तयार करण्यात येणाऱ्या कालव्यात गेल्याने त्याला मोबदला मिळाला होता. त्या रकमेतून त्याने ट्रॅक्टर खरेदी केला होता. या कुटुंबात पती-पत्नीसह ३ मुली व १ मुलगा आहे. परवा(ता.१२सप्टेंबर) रोजी सायंकाळी ४ वाजता चे सुमारास त्या कुटुंबातील २२ वर्षीय युवकाने ट्रॅक्टर घेऊन रेंगोळा केसलवाडा मार्गाने जात असताना कालव्या लगत त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनासह तो कालव्यात पडून गंभीर जखमी झाला. गावकऱ्यांना या अपघाताबाबद माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठून त्याला कालव्याबाहेर काढले व उपचाराकरिता पालांदूर च्या एका खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आल्यामुळे त्याचा मृतदेह घरी आणून नातेवाईकांना माहिती देण्यात आली व दुसरे दिवशी(ता.१३) रोजी त्याचेवर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
पालांदूर पोलिस ठाण्याची स्वतःची गुप्तचर यंत्रणा आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस सावंत यांचे मार्गदर्शनात पोलिस नायक तिजारे हे गुप्तचर विभागाचे काम पाहतात. पोलिस ठाण्याचे हद्दीत सर्व गावातील पोलिस पाटील , कोतवाल आणि खबरे(मुखबिर) गावात घडणाऱ्या घटनांची खडा न खडा माहिती पोलिसांना देतात. पण ह्या अपघाताच्या घटनेचा सुगावा का लागला नाही. हे एक कोडेच आहे किंवा हेतूपुरस्पर दुर्लक्ष करण्यात आले. हे कळण्यास मार्ग नाही. या प्रकाराने पालांदूर पोलिस ठाण्याच्या गुप्तचर यंत्रणेचे तीनतेरा वाजल्याच्या तालुक्यात चर्चा होत असल्या तरी हे अपघात प्रकरण काय वळण घेते. याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
स्टेटमेंट/प्रतिक्रिया(चौकट)
काल(ता.१३) दुपारी २ वाजता पर्यंत अपघाताबाबद पोलिस स्टेशनला सूचना नव्हती. त्यानंतर दुपारी २ वाजता मी भंडारा येथे गेलो व आज माझी साप्ताहिक असल्यामुळे मला काहीही माहिती नाही.
दिनेश तिजारे गुप्तचर पोलिस ठाणे पालांदुर

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular