Friday, April 19, 2024
Homeभंडारापक्षाचे सर्व कार्यक्रम प्रभावीपणे राबवून पक्ष क्रमांक एक बनवा : मा. नानाभाऊ...

पक्षाचे सर्व कार्यक्रम प्रभावीपणे राबवून पक्ष क्रमांक एक बनवा : मा. नानाभाऊ पटोले, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष

लाखनी:
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत लाखनी तालुका काँग्रेस कमिटीची बैठक व कार्यकर्ता मेळावा पार पडला.
आपल्या मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी आपण सातत्याने निधी उपलब्ध करत आहोत, अनेक विकास काम आज सुरु आहेत. क्षेत्राचा विकास होत असताना पक्ष देखील मजबूत होणे अत्यंत आवश्यक आहे, त्यासाठी आपण सर्वांनी तन-मन-धनाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. काँग्रेस पक्षाला त्यागाचा, बलिदानाचा इतिहास आहे. या देशाच्या उभारणीत काँग्रेस पक्षाचं मोठे योगदान आहे. लाखनी तालुक्यात काँग्रेसचं चांगलं नेटवर्क आहे, ते अधिक मजबूत करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पक्ष, पक्षाचे विचार, पक्षाद्वारे राबवल्या गेलेल्या योजना या सगळ्यांची माहिती पोहोचवा आणि आपला पक्ष क्रमांक एकचा पक्ष असला पाहिजे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा अशा सूचना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी दिल्या.

लाखनी येथे आयोजित पक्षाच्या बैठकीत आणि कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनभाऊ पंचभाई यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले. जिल्ह्यात काँग्रेस पक्ष उत्तम कार्यक्रम राबवत असून सर्व लाखनी तालुक्यात देखील सर्व कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा, आपण निश्चितच अपेक्षित यश प्राप्त करू असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्यासह जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, ज्येष्ठ नेते शफीभाई लद्धानी, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, प्रदेश महासचिव जियाभाई पटेल, तालुका अध्यक्ष राजु निर्वाण, शहर अध्यक्ष पप्पू गिरेपुंजे, धनराज साठवणे, रवी भुसारी, चंद्रकांत निंबार्ते, कैलास भगत, नगरसेवक नितीन धकाते, रुपलता जांभुळकर, धनंजय तिरपुडे, जयकृष्ण फेंडरकर, उमराव आठोडे, प्रदीप बुराडे, दादू खोब्रागडे, विजय कापसे, मीनाक्षी बोपचे, पंकज शामकुवर, संध्या धांडे, संजीवनी नान्हे, कल्पना भिवगडे, कपिल देशपांडे,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्यासह जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, ज्येष्ठ नेते शफीभाई लद्धानी, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, प्रदेश महासचिव जियाभाई पटेल, तालुका अध्यक्ष राजु निर्वाण, शहर अध्यक्ष पप्पू गिरेपुंजे, विविध विभाग जिलाध्यक्ष धनराज साठवणे, रवी भुसारी, चंद्रकांत निंबार्ते, कैलास भगत, प्रदीप बुराडे, नगरसेवक नितीन धकाते, रुपलता जांभुळकर, धनंजय तिरपुडे, जयकृष्ण फेंडरकर, उमराव आठोडे, दादू खोब्रागडे, विजय कापसे, मीनाक्षी बोपचे, माजी नगराध्यक्षा कल्पना भिवगडे, सरपंचा संजीवनी नान्हे, सरपंचा सुनिता भालेराव, सुनंदा धनजोडे, संध्या धांडे,
आदी मान्यवर उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular