Friday, April 19, 2024
Homeनागपुरमहाआवास अभियान पुरस्काराचे वितरण आ.आशिष जयस्वाल यांच्या शुभ हस्ते

महाआवास अभियान पुरस्काराचे वितरण आ.आशिष जयस्वाल यांच्या शुभ हस्ते


रामटेक – महाआवास अभियान
ग्रामीण अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी व कामगिरी करणार्‍या व्यक्तींचा पंचायत समिती रामटेक येथे आज दि.३ सप्टेंबर २०२१ ला आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात आले.

यात महाआवास अभियान व कोरोना काळात उल्लेखनिय कार्याबद्दल तहसिलदार बाळासाहेब मस्के,तालुका वैधकीय अधिकारी डाॅ.चेतन नाईकवार,साक्षोधन कडबे,रामकृष्ण कुबडे,प्रभाकर चन्ने,नारायण कुंभलकर,राजेश जगणे,सागर वानखेडे,अर्जुन खेवले,कल्पना भुजाडे,राजेंद्र बन्सोड,राजीव मडामे,निवृत्ती नेवारे,प्रधानमंञी सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत नगरधन चे सरपंच प्रशांत कामडी,सचिव पवन उईके,ग्रा.पं.काचुरवाही सरपंच शैलैश राऊत,सचिव समाधान वानखेडे,ग्रा.पं.पथरई सरपंच संदीप वासनिक,सचिव धर्मदास घारड,राज्यपुरस्कृत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा पुरस्कार तालुक्यातील वडंबा,बोथिया पालोरा व उमरी यांना प्राप्त झाला.यावेळी सरपंच विना ढोरे,सुधिर नाखले,कविता राऊत,मुकुंदा मरसकोल्हे,नारायण कुंभलकर व प्रकाश जाधव यांना पुरस्कृत करण्यात आले.
सर्वोत्कृष्ट प्रधानमंञी आवास योजना अंतर्गत वैयक्तिक घरकुलांसाठी नगरधन येथिल शंकर नान्हे,काचुरवाहीचे अंकुश पोटभरे व मनसरचे मनोज पगाडे यांचा गौरव करण्यात आला.त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कृत घरकुल योजनेसाठी(रमाई आवास योजना) देवलापार येथिल जाईबाई वाहाणे,कट्टा येथिल बिसनी भलावी व पंचाळाचे हरीराम तांडेकर यांना पुरस्कृत करण्यात आले.या कार्यक्रमाला जि.प.सदस्य सतिश डोंगरे,सभापती रविंद्र कुंभरे,पं.स.सदस्य नरेंद्र बंभाटे,संजय नेवारे,चंद्रकांत कोडवते,रिता कठौते,गटविकास अधिकारी प्रदिप बमनोटे,पंचायत समितीचे सर्व विस्तार अधिकारी,सचिव,लाभार्थी उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular