Wednesday, April 17, 2024
Homeचंद्रपुरने हि महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे रक्तदान शिबीर आयोजन

ने हि महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे रक्तदान शिबीर आयोजन

अर्हेरनवरगाव :– नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे आयोजित राष्टीय सेवा योजना , 3 महा. गर्ल्स बटालियन एन सी सी नागपूर , 20 महा. बाटालियन एन सी सी नागपूर , हिताआयु लोकसेवा बहुउदेशिय संस्था ब्रम्हपुरी व शासकीय ग्रामीण रूग्णालय गडचिरोली यांच्या सयुक्त विद्यामाने रक्तदान व रक्तगट शिबीर तपासणी चे आयोजन करण्यात आले होते.

यात 200 विद्यार्थ्यांनी रक्तगट तपासले स्नेह मैंद ,शैलेश भोयर,हसनुक सुखारे, साहिल मैंद,देवेंद्र तोंडरे , शिवराम गावतुरे व पवन कुंभरे या विद्यार्थ्यांनी रक्तदान केले . यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन एस कोकोडे यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे हीच खरी समाजसेवा व देश सेवा आहे .

असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या . तर उपप्राचार्य डॉ डी एच गहाणे यांनी विद्यार्थ्यांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहीत केले. शिबीराचे आयोजन डॉ प्रकाश वट्टी रासेयो प्रमुख , लेप्ट. डॉ के के गील एन सी सी प्रमुख 3 महा गर्ल्स बटालियन नागपूर . , लेप्ट. प्रा अभिजित परकरवार एन सी सी प्रमुख 20 महा बटालियन नागपूर . प्रा मिलिंद पठाडे रासेयो कार्यक्रमधिकारी , श्री स्वप्नील अलगदेवे अध्यक्ष व सचिव प्रा सुयोग बाळबुध्दे हिताआयु लोकसेवा बहुउदेशिय संस्था ब्रम्हपुरी यांनी केले शिबीर यशस्वी करिता रासेयो स्वंयसेवक अनिकेत उराडे , अभिषेक चांदेकर व ओमदेव यांनी परिश्रम घेतले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular