Friday, March 29, 2024
Homeचंद्रपुरकॉंग्रेसच्या 'गाव चलो अभियानाला' भारोसा येथून सुरुवात

कॉंग्रेसच्या ‘गाव चलो अभियानाला’ भारोसा येथून सुरुवात

महिलांसह ६० युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

गडचांदुर .मो.रफिक शेख –

आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा विधानसभा काँग्रेसच्या वतीने आजपासून ‘गाव चलो अभियानाचा’ प्रारंभ करण्यात आला. कोरपना तालुक्यातील भारोसा या गावातून सदर अभियानाला सुरुवात करण्यात आली असून यावेळी महिलांसह ६० युवकांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी गाव चलो अभियानाचे अभियानाचे समन्वयक राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आशिष देरकर, काँग्रेसचे जेष्ठ नेते सुरेश मालेकर, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शैलेश लोखंडे, निराधार योजनेचे अध्यक्ष उमेश राजुरकर, नितीन बावणे, बंडु चौधरी, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव मिलिंद ताकसांडे, विधानसभा महासचिव रोशन आस्वले, काँग्रेसचे ओबीसी विभागाचे तालुका अध्यक्ष राहुल मालेकर, दिपक पानघाटे, भोयगावच्या सरपंच शालुताई बोंडे, वामन पावडे, नानाजी तोडासे, मनोहर पिदूरकर, मारोती गोखरे, राजेंद्र धोंगळे, भास्कर कुंभे, भगवान धोंगळे, कोकिळा धोंगळे, तानेबाई धोंगळे, शेवंताबाई पावडे, प्रतीक्षा पिदूरकर उपस्थित होते. भारोसा येथील शेतकरी संघटना व भाजपातील अनेक महिलांसह ६० युवकांनी यावेळी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाचे संचालन युवा नेते एकनाथ गोखरे यांनी केले.

   काँग्रेस पक्षाचे विचार, ध्येय, धोरणे घराघरात पोचविणे, नवीन कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाशी जोडणे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे, युवकांना राजकारणाचे महत्व समजावून सांगणे असे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनात राजुरा विधानसभा क्षेत्रात प्रत्येक गावात हे अभियान राबविण्याचा आमचा मानस आहे.
  • आशिष देरकर
    माजी अध्यक्ष, राजुरा विधानसभा युवक काँग्रेस
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular