Sunday, October 17, 2021
Homeयवतमाळयवतमाळात कृषी कायद्याच्या विरोधातील ट्रॅक्टर मार्च

यवतमाळात कृषी कायद्याच्या विरोधातील ट्रॅक्टर मार्च

यवतमाळ : केंन्द्र सरकारने तीन कृषी कायदे पारीत केल्यामुळे देशभर शेतक-यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दिल्ली येथे तर दोन महिण्यापासून शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे.

या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी तसेच पारीत कृषी कायदे परत घेण्यासाठी प्रजासत्ताक दिनी यवतमाळात शेतकरी वारकरी संघटना तसेच किसान ब्रिगेड च्या वतीने ट्रॅक्टर मार्च काढण्यात आला.
शारदा चौक परीसरातून घोषणा देत निघालेला हा मार्च शहरातून फिरुन येरावार चौकात आला. याठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळयाला हारार्पण करुन मार्चची सांगता करण्यात आली. ट्रॅक्टर वर अनेक श्लोगन लिहीलेले पोस्टर लावण्यात आले होते. या ट्रॅक्टर मार्च ने नागरीकांचे लक्ष वेधून घेतले. मार्चची सांगता झाल्यानंतर शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी केन्द्र सरकारच्या धोरणावर टिका केली. शेतक-यांना साखळीमध्ये जकडून ठेवण्याचे आणि भांडवलदारांना राण मोकळे करण्याचे धोरण आम्ही खपवून घेणार नाही. शेतकरीच नव्हे तर नागरीकांना सुध्दा या कृषी कायद्याचा फटका बसनार आहे. त्यामुळे शेतकरी तसेच नागरीकांचा या कायद्यांना विरोध असल्याचे प्रतिपादन सिकंदर शहा यांनी केले. या कायद्याला पुढेही कठोर विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. या मार्च मध्ये अनुप चव्हाण संयोजक शेतकरी वारकरी संघटना, प्रकाश पाटील बुटले, विशाल चव्हाण भारी ग्रामपंचायत सदस्य तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कोट
कायद्यांना 80 टक्के शेतक-यांचा विरोध

केंन्द्र सरकारने पारीत केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांना देशभरातील 80 टक्के शेतक-यांचा विरोध आहे. जगातील शंभर देशाच्या लोकसंख्ये एवढे शेतकरी विरोध करीत असतांना केन्द्र सरकार मात्र शेतक-यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही. सरकारचा हा आडमुठेपणा आम्ही खपवून घेणार नाही. या ट्रॅक्टर मार्च नंतर आनखी प्रखर विरोध केला जाईल.

पुरुषोत्तम गावंडे
प्रदेशाध्यक्ष, किसान ब्रिगेड

Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

52 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular