Sunday, October 17, 2021
Homeचंद्रपुरयुवती साठी स्वरोजगार मेळावा रोजगारातून स्वावलंबी व्हावे - तब्बसूम आझमी

युवती साठी स्वरोजगार मेळावा रोजगारातून स्वावलंबी व्हावे – तब्बसूम आझमी

गडचादुर – मो.रफिक शेख सात दिवसीय व्यवसायिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन गौरीशंकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था वर्धा द्वारा क्री हैडा युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा यांच्या सहकार्याने युवतींसाठी स्वयंरोगार उपक्रम राबिण्यात आला.
शिबिराचे उद्घाटन नगरपरिषद बचत गट मॅनेजर सौ चित्राताई चाफले व कौशल्य विकास विभाग सौ ठाकरे मॅडम यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार घालून द्वीप प्रज्वलन करून पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष ( लिटिल स्टार कांव्हेंट अध्यक्ष) बुशरा पठाण मॅडम व प्रमुख पाहूणे म्हणून (सन शाईन स्कूल वर्धा) अध्यक्ष मॅडम, आझमी तबस्सुम ,गोसिया नियाजी मॅडम उपस्थित होत्या. युवतींना मान्यवरांनी स्वयंरोजगारासबंधी विविध विषयावर मार्गदर्शनपर भाषण दिले.व्यवसाय करण्यासाठी कौशल्य किती गरजेचे असते याची सविस्तर माहिती दिली.


शिबिरामध्ये विविध व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वतःचा व्यवसाय करून सक्षम बनावे यावर जास्त भर देण्यात आला.प्रशिक्षणाला अनुभवी प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती प्रशिक्षणाचे विषय शिवण काम, मास्क शिवणे, कापडी बॅग,पेपर बॅग,मेहंदी काढणे,संस्कार भारती रांगोळी इ. होते.शिबिरात नवरात्र महिला बचत गट व इतर युवतींचा समावेश होता.
आमचे प्रेरणा स्थान महात्मा गांधीचा आत्मनिर्भर देश व सावित्रीबाई फुले यांनी महिलांना सुशिक्षित करण्यासाठी दिलेले योगदान यांचा कर मेळ साधण्याचा प्रयत्न केला तर खरचं आत्मनिर्भर देशाचे स्वप्न साकार होईल अशी आम्ही आशा करतो.
शिबिराचे समापन महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त करण्यात आले.यातून प्रेरणा घेऊन युवतींनी व्यवसाय करण्याची व आत्मनिर्भर बनण्याची हमी देण्यात आली.शिबिराचे आयोजन गौरीशंकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था सचिव श्रीमती लताताई होलगरे यांनी केले शिबिर खूप छान पार पडले.

Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular