Thursday, April 25, 2024
Homeचंद्रपुरडॉ. अनंता सूर यांच्या 'वाताहत' कथासंग्रहाला राज्यस्तरीय साहित्य निर्मिती पुरस्कार जाहीर

डॉ. अनंता सूर यांच्या ‘वाताहत’ कथासंग्रहाला राज्यस्तरीय साहित्य निर्मिती पुरस्कार जाहीर

गडचांदुर्- मो.रफिक शेख –
सोलापूर येथील प्रसिद्ध लेखिका सौ.निर्मला मठपती यांच्या स्मृती प्रित्यर्थ निर्मला मठपती फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य निर्मिती पुरस्कार २०२१ साठी २०१९ आणि २०२० या दोन वर्षात काव्यसंग्रह,कथासंग्रह आणि बालसाहित्य मागविण्यात आले होते.या पुरस्कारासाठी संस्थेला एकूण ११५ प्रवेशिका प्राप्त झाल्या.त्यातून तिन्ही वाङ्मय पुरस्कारासाठी दोन -दोन याप्रमाणे सहा साहित्यकृतीची निवड करण्यात आली. त्यामध्ये डॉ. अनंता सूर यांच्या ‘वाताहत’ या कथासंग्रहाची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे फाउंडेशनचे सचिव श्री.यु.बी. मठपती यांनी निकालाद्वारे जाहीर केले आहे. ‘वाताहत’ या कथासंग्रहाला मिळालेला हा आठवा पुरस्कार असून येत्या ३० ऑक्टोबरला सोलापूर येथे होणाऱ्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात डॉ. अनंता सूर यांना रोख रक्कम ,सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती निर्मला मठपती फाउंडेशनचे सचिव श्री. यु.बी.मठपती यांनी नुकतीच एका निकालपत्रकाद्वारे कळविली आहे.


डॉ. अनंता सूर हे यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील मुकुटबनच्या श्री गजानन महाराज कला व महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून मागील अठरा वर्षांपासून कार्यरत असून त्यांची आजवर १७ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.’वाताहत’कथासंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल बिराडकार अशोक पवार,डॉ. संतोष देठे,डॉ. किशोर कवठे,अविनाश पोईनकर,सौ.संगिता धोटे,डॉ. संजय लाटेलवार,कथाकार विलास सिंदगीकर,रामदास केदार,डॉ. अनिल दडमल, डॉ. शरद उमाटे,अंबादास केदार सर,प्रा.ज्ञानेश्वर हंडरगुळीकर,डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ. बळवंत भोयर ,डॉ. यशवंत घुमे,अनिलभाऊ बालसराफ यांनी अभिनंदन केले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular